अग्निपथ नेमका काय विषय आहे याची माहिती मिळावी म्हणून हा लेख पाठवत आहे.... कोणत्याही पक्षाची बाजू येथे मांडण्यात येत नाही, फक्त ज्यांना माहिती नाही अशासाठी हा लेख.........
अग्नीपथचा मार्ग म्हणजे सुवर्णमार्ग
सैनिक म्हणून ४ वर्षे देशाची सेवा करणेची संधी मिळणार आहे यामध्ये राहणे, जेवण, उपचार वगैरे सर्व मोफत आहे म्हणजे व्यसनाची सवय लागायच्या वयात ही सुवर्णसंधी मिळणार आहे आणि या ४ वर्षात २३ लाख ४३ हजार १६० रुपये आपण कमवणार आहात.
पहिले वर्ष- २१००० × १२ = २,५२,०००/-
दुसरे वर्ष- २३१०० × १२ = २.७७.२००/-
तिसरे वर्ष- ५५५८० x १२ = ३.०९,६६०/-
चौथे वर्ष- २८००० x १२ = ३,३६,०००/-
,
४ वर्षांचा पगार = रु.११,७२,१६०
निवृत्तीनंतर = रु.११,७१,०००
एकूण = *२३,४३,१६० रुपये
तुम्ही १७ ते २३ वयोगटांतील मुलांनी अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय सैन्यात भरती होणे आवश्यक आहे.
१७ व्या वर्षी कोणाला मिळते शासकीय नोकरी???
शासनाचा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे .रोजगारांसोबत शिस्त येईल,जी नेहमी उपयोगी पडेल.
वयाच्या २१ व्या वर्षी ही रक्कम नवीन नोकरीसाठी पुरेशी आहे आणि जर अर्थपूर्ण प्रयत्न केले तर पुन्हा कुठेही नोकरी सहज मिळेल.
लष्करी प्रशिक्षण पाहिजे जे तुम्हाला शिस्त शिकण्याची संधी देत आहे.
१२वी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर थेट अग्निपथच्या मार्गावर जा, हेच तुमचे भविष्य आहे.
वयाच्या २१ - २२ व्या वर्षी निवृत्तीनंतर तुम्ही या पैशांतून व्यवसाय सुरू कराल, सध्या जे चालले आहे त्यापेक्षा आयुष्य चांगले होणार आहे.
कल्पना करा की वयाच्या २१ व्या वर्षी सैन्याचे प्रशिक्षण घेऊन शून्य ते ११ लाख रुपये पगार म्हणून मिळणार व निवृत्तीच्या वेळी मिळालेले ११ लाख ७१ हजार रुपये मिळणार हे काय कमी नाही.
★अग्निपथ अंतर्गत साडे सतरा ते २१ वयोगटातील १०० जणांना ट्रेनिंग देऊन आर्मीमध्ये सहभागी केलं जाईल,४ वर्ष त्यांचं काम पाहून त्यातील योग्य २५ जणांना परमानेंट नोकरी दिली जाईल आणि बाकीच्या ७५ जाणांना निवृत्त केलं जाईल,पुन्हा दूसऱ्या बॅच मधील १०० पैकी २५ योग्य जणांना कायमस्वरूपी नोकरी देऊन ७५ जणांना निवृत्त केलं जाईल.
★यादरम्यान पहिल्या वर्षी त्यांना ३०,००० रूपये प्रतिमाहिना पगार भेटेल ज्यात दरवर्षी वाढ केली जाईल आणि शेवटच्या वर्षी ४०,००० रूपये प्रतिमहिना पगार असेल.
★निवृत्त करताना त्यांना ११,७१,००० रूपये सेवानिधी दिला जाईल.
★यादरम्यान कोणता अग्निवीर शहिद झाल्यास त्याच्या कुटूंबियांना १ कोटी निधी दिला जाईल. (पगार + सेवानिधी +, +४८,००,००० लाख रूपये असे विविध निधी व्याजासहित)
★सेवेदरम्यान कोणता अवयव अपंग झाल्यास ४८ लाख रूपये देण्यात येतील.
★ १०० पैकी परमानेंट झालेल्याा २५ जणांना पेन्शन,मेडिकल सारख्या सर्व आर्मी सूविधा असतील.
★ १०० पैकी निवृत्त झालेल्या ७५ जणांना राज्य पोलिस भर्तीमध्ये प्राथमिकता देऊन नोकरी दिली जाईल.
★ केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात देखील निवृत्त अग्निवीरांना प्राथमिकता देऊन नोकरी दिली जाईल.
★असम राइफल्स मध्ये देखील निवृत्त अग्निवीर प्राथमिकता देऊन नोकरी दिली जाईल.
★अशा विविध सरकारी सुरक्षा दलांमध्ये निवृत्त अग्निवीरांना प्राथमिकता दिली जाईल.
★समजा जर एखाद्या निवृत्त अग्निवीराने ईतर सुरक्षा दलात नोकरी करण्याजागी मिळालेल्या सेवानिधी (₹११,७१,०००) बरोबर स्वताचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला आणखिन भांडवलाची गरज असेल तर सरकार त्याला १० लाख रूपयांचं कर्ज देईल.
★ २०३० पर्यंत दरवर्षी १,६०,००० यूवकांना भर्ती केलं जाईल.
एकप्रकारे अग्निपथ ही ४ वर्षांची रोजगार हमी योजना नसून ४ वर्षांची भर्ती परिक्षा आहे ज्यात रिजेक्ट होणारे देखील ४० ते ४५ लाख रूपये अगदी कमी वयात कमावतील.
अता हा निर्णय भारतीय सैन्याने का घेतला ? जर तूम्ही भारतीय सैन्याद्वारे घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदा पहाल तर सर्वात पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे सैन्यात सरासरी वय ३२ वायाची लोकं आहेत त्याला कमी करून २५ ते २६ पर्यंत आणने हे लष्कराचे उदिष्ट आहे.
ही योजना भारतीय सैन्यानेच गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत आखली आहे.
अता याला विरोध का होतोय ? कारण अनेकांनी योजना स्वता न समजून घेता अफवांवर विश्वास ठेवला आहे,
जसं की आर्मी मध्ये परमानेंट नोकऱ्या बंद होतायत,पेन्शन बंद होतीये,पगारी भेटणार नाहीत,निवृत्ती निधी बंद होतोय,भर्ती बंद केली जाणार आहे,४ वर्षानंतर निवृत्त सैनिकाला नोकरी मध्ये प्राधान्य नसणार अशा अनेक अफवांमूळे विरोध होत आहे.
त्यात विरोधी पक्षांनी विरोधामध्ये उडी टाकल्यामूळे आंदोलने हिंसक होत आहेत.
सर्वांनी भारतीय सैन्याने घेतलेल्या पत्रकार परिषदा पहाव्यात,कोणत्याही सोम्या गोम्या वर विश्वास ठेऊन विरोध करण्यापेक्षा भारतीय सैन्य काय म्हणतय ते पाहून विरोध किंवा समर्थन करा.
या योजनेचा प्रस्ताव भारतीय सैन्यानेच केंद्र सरकार पूढे ठेवलेला असल्यामूळे भविष्यात कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ दे,त्यांना ही योजना राबवावीच लागेल.
-विवेक मोरे
विनंती - अग्निपथ योजनेच्या निषेधाचा भाग बनू नका.
जयहिन्द
Social Plugin